Pune Crime News : वाढदिवसालाच शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिवनी गावातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. वाढदिवसाच्या दिवशीच एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. , शिवानी जालिंदर लिंभोरे (वय 13) असे गळफास घेतलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी जालिंदर लिंभोरे शेतकाम करून घरी परत आले असता घराचा दरवाजा उघडून त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर शिवानी हिने गळफास घेतला असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर जालिंदर लिंबोरे यांनी याची माहिती जेजुरी पोलिसांना दिली.

शिवानी ही महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी तिचा वाढदिवस होता. याच दिवशी तिने गळफास घेऊन अशाप्रकारे आत्महत्या केल्याने पुरंदर तालुक्यात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.