Pune Crime news : चोरांना पाहून पोलिसांनी काढला पळ

पुण्यातील पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एमपीसीन्यूज ; चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना पकडण्याऐवजी त्यांना पाहून पोलिसच पळून गेले. पुण्यातील औंध परिसरातील सिद्धार्थनगर भागात रविवारी पहाटे हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.

त्याचे झाले असे की, सिद्धार्थ नगरातील शैलेश टॉवर सोसायटीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे घुसले. त्यातील दोघांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून पकडून ठेवले, तर इतर दोघांनी सोसायटीत प्रवेश करून कटरच्या सहाय्याने खेडचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान चोरट्यांच्या या हालचालीचा मागावा सोसायटीतील एका व्यक्तीने पाहिला आणि तत्काळ पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी चोरांना पाहिलेही, पण या चोरांना पकडण्याऐवजी पोलिसच पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चोरट्यांनी शैलेश टॉवर या सोसायटीतील चार बंद फ्लॅटचे कुलूप तोडले. पाचव्या घराचे कुलूप तोडत असताना शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला आणि चोरीचा डाव फसला.

सुदैवाने कुलूप तोडलेल्या फ्लॅटमध्ये कुणीही राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यांनी जाताना फक्त एका घरातील एलसीडी टीव्ही चोरून नेला.

दरम्यान, सोसायटी बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर-पोलिसांचा हा सर्व खेळ कैद झाला आहे. सोसायटी मध्ये चोर घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झालेले सीसीटीवी कॅमेरा दिसत आहेत.

त्यांच्याजवळ वायरलेस फोनही होते. ते चोरट्यांना पकडूही शकले असते. पण असे काही न करता त्यांनीच घटनास्थळावरून पळ काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.