Pune Crime News : औंधमध्ये चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ दाम्पत्याला 16 लाखांना लुटले

एमपीसी न्यूज – पुण्यातील औंध परिसरातून घरफोडीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या बंगल्याला चोरट्यांनी टार्गेट केले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंगल्यात शिरलेल्या तीन चोरट्यांनी चाकूच्या धाकाने तब्बल 16 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

चोरट्यांनी या जेष्ठ दांपत्याला ‘पोलिस को खबर करेंगे तो, आपको वापस आ के खतम करेंगे’ अशी धमकी देत त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते.

_MPC_DIR_MPU_II

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात एका 73 वर्षीय ज्येष्ठ महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, औंध परिसरातील सिंध सोसायटीमध्ये हे ज्येष्ठ दांपत्य राहतात. त्यांचा स्वतःचा बंगला आहे. या बंगल्यात ते स्वयंपाकी यासह राहतात. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल लावलेले तीन चोरटे त्यांच्या घरात शिरले. त्यांनी स्वयंपाकी आणि ज्येष्ठांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश करत कपाटातील 70 हजाराची रोख रक्कम, यु.एस डॉलर आणि इतर असा 15 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान या चोरट्यांनी जाताना घरातील तिघांनाही बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते. त्यांना ‘पोलिस को खबर करेंगे तो, आपको वापस आ के खतम करेंगे अशी धमकी देखील दिली आहे. चोर निघून गेल्यानंतर या दाम्पत्याने स्वतःची सुटका करुन घेत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.