Pune Crime News : मोटार दुभाजकाला धडकल्याने एक ज्येष्ठ नागरिक ठार; पती-पत्नी जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिक ठार तर पती-पत्नी जखमी झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील  कॅन्टोमेंट बोर्ड टोलनाक्यासमोर घडली.

पांडुरंग जयराम कुलकर्णी (वय 72) असे ठार झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक भोेईर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास कुलकर्णी कुटुंंबीय कॅन्टोमेंट परिसरातून जात होते. त्यावेळी पांडुरंग यांचा मुलगा मोटार चालवित होता. त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामुळे पांडुरंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.