Pune Crime News : खळबळजनक घटना ! जिम ट्रेनर तरुणीवर सहकाऱ्याकडून बलात्कार

एमपीसी न्यूज – पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शीतपेयातून गुंगीचे औषध मिसळून एका जीम ट्रेनरने सहकारी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. खराडी परिसरात असलेल्या एका फिटनेस क्लब मध्ये तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील फिटनेस क्लबमध्ये आरोपी दीपक चौगुले आणि पीडित तरुणी ट्रेनर आहेत. तीन दिवसांपुर्वी दीपकने तक्रारदार तरुणीला भुक लागल्याचे सांगून जीममध्ये डबा घेऊन बोलाविले. त्यानंतर दीपकने शितपेयात गुंगीचे औषध मिसळून तरुणीला प्यायला दिले. काही वेळानंतर तरुणीला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर दीपकने तरुणीला शरीर संबंधाचा व्हिडिओ असल्याचे सांगून धमकी दिली. त्याशिवाय घटनेबाबत कोणाला काही बोलल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.