Pune Crime News : तरूणीच्या नाका-तोंडात गांजाचा धूर सोडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज -तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली. पण, तिने भांडण झाल्याच्या रागातून नकार दिला. त्यावेळी तरुणाने (Pune Crime News)तिचे हात-पाय कपडयाने बांधून गांजा ओढून त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

 

Talewade News : डीअर पार्क नव्हे बायोडायव्हरसिटी  पार्क उभारणार

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 22  वर्षीय पिडीत तरूणीने तक्रार दिली आहे. दोघांचे प्रेम संबंध होते. पण, श्रवणचे दुसर्‍या  मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झालेले होते.
 दरम्यान, श्रवण याने घराचा दरवाजा लावुन पिडीत तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली. तरूणीने नकार दिला. मात्र, त्यानंतर देखील श्रवणने पिडीत तरूणीचे हात कपडयाने बांधून गांजा ओढुन त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडला. तिच्या डोक्यात आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गांजाचा धूर नाकात गेल्याने तरूणीला गुंगी आली. अंकुशेने तिच्या इच्छेविरूध्द बलात्कार केला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक (Pune Crime News) तोरगल करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.