Pune Crime News : ब्ल्यू फिल्म पाहून केले अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पत्नीच्या तक्रारीनंतर पतीला अटक

एमपीसीन्यूज : पतीने ब्ल्यू फिल्म लावून अघोरी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार एका 44 वर्षीय महिलेने दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 48 वर्षीय पतीला अटक केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 24 वर्षांपूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले. त्यांना एक मुलगीही आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून पतीने फिर्यादीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले.

तसेच ब्ल्यू फिल्म लावून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध अनेकवेळा अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवले. तसेच फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला.

फिर्यादीच्या मुलीने पैसे मागितले असता आरोपीने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. फिर्यादी महिलेचे आणि मुलीचे पालनपोषण करण्याची जबाबदारी असतानाही आरोपीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

वानवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.