Pune Crime News : धक्कादायक… विवाहित महिलेच्या मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर

एमपीसी न्यूज-शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात (Pune Crime News)  किळसवाणा प्रकार घडला .विवाहित महिलेच्या मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 27 वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पती, सासू, सासरे, दिर, मावस दिर आणि आणखी एका व्यक्तीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरू होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. 2 वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीच्या प्रेम विवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासीक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासीक पाळीचे रक्त 50 हजारात जादुटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

Pimpri News : खोटी स्वप्ने दाखविणारा अर्थसंकल्प –  काशिनाथ नखाते

या प्रकरणी आता महिला आयोगाकडून देखील चौकशीचे आदेश देण्यात असल्याची माहिती, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.पुण्यात अतिशय घृणास्पद घटना असून विकृत मानसिकता असणाऱ्या या आरोपींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. राज्य महिला आयोगात यात संबंधितांना निर्देश देईलच पण पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रद्धेला बळी पडणारी कुटु्ंब आहेत ही दुदैवी आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.