Pune Crime News : कोंढव्यातील धक्कादायक प्रकार, सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज – शहरात सोसायटीच्या सुरक्षा रक्षकच भक्षक बनल्याचे चित्र दिसत असून, एका 48 वर्षीय नराधम सुरक्षारक्षकाने 5 आणि 7 वर्षीय चिमुकल्या मुलींशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून, यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात चंद्रकांत वाटाडे (वय 48) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाव्यातील एका मोठ्या सोसायटीत आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो तेथे आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने फिर्यादी यांच्या मुलींसोबत लिफ्टमध्ये अश्लील चाळे करत त्यांचा लैंगिक छळ केला. तो काही दिवसांपासून हा घाणेरडा प्रकार करत असल्याचे समजते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

शहरात सोसायटीचे सुरक्षारक्षक असे प्रकार करत असल्याच्या यापूर्वी देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.