Pune Crime News : धक्कादायक ! मार्केटयार्ड परिसरातून बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला, खुनाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 20 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही तरुणी बायोडाटा तयार करण्याचे कारण सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर आठ तास झाले तरी ती घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी रात्री दहा वाजता मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती.

दरम्यान, दुसऱ्याच दिवशी 21 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मांजरी येथील रेल्वे रुळाजवळ तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. तिच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळल्या आहेत. या जखमा पाहताच खून झाला असण्याची दाट शक्यता आहे. मार्केटयार्ड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.