Pune Crime News: धक्कादायक! कोथरूड मध्ये 13 वर्षीय विशेष मुलाचा खून, मृतदेह ठेवला पोत्यात बांधून

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कोथरूड परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोथरूड एकलव्य पॉलीटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानाजवळ एका 13 वर्षीय विशेष मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्यास हा प्रकार उघडकीस आलाय. गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे.

करण गोपाल राठोड (वय 13) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

गुरुवारी रात्रीच्या वेळी मैदानावर मुले खेळत असताना त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवले असल्याचे आढळले. त्यांनी पोते उघडून पाहिले असता मृतदेह दिसला. या मुलांनी आसपासच्या लोकांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना त्याची खबर लागली. मयत मुलीला हा विशेष आहे. त्याचे आई-वडील मजुरी करतात. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यामुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.