Pune Crime News : मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेली श्रद्धा परतलीच नाही, पोलिसात तक्रार दाखल

0

एमपीसीन्यूज : मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी आठ दिवसानंतर ही घरी परतलीच नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

श्रद्धा लक्ष्मण सगर (वय 17 वर्ष 6 महिने) असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तिच्या वडिलांनी याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा सगर पुण्याच्या लोहगाव परिसरात कुटुंबियासह राहते. 12 नोव्हेंबर रोजी टिंगरे नगर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली.

ती अद्याप परत आलीच नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III