Pune Crime News : घरफोड्या करणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड पोलिसांचा तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी एका सराईत घर सोडायला तांत्रिकरित्या तपास करून अटक केली आहे.

समिर ऊर्फ सोन्या वाल्मीक खेडेकर (वय- 28 वर्ष रा.चाळ नं. अटल 11. अगम मंदिरा जवळ आंबेगाव खु. पुणे) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत सहा घरफोड्या केल्याची कबुली केली असून त्याच्या ताब्यातून तब्बल दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की सिंहगड रोड पोलीस ठाणे भागात होणाऱ्या घरफोड्याच्या शोध घेण्यासाठी तपास पथकातील कर्मचारी काम करत होते. तांत्रिक विश्लेषण करीत असताना तपास पथकातील कर्मचारी शंकर कुंभार व उज्ज्वल मोकाशी यांनी मिळालेल्या माहितीवरून वडगाव ब्रिज येथील हॉटेल पी के बिर्याणी समोरून गुंड समीर उर्फ सोन्या वाल्मीकी खेडकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सहा ठिकाणी सहा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबेले, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन बुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुमार, उज्ज्वल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, धनाजी घोत्रे, निलेश कुलथे, किंशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांचे पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.