Bibwewadi Crime News : साडेसात हजारात 32 इंची टीव्ही देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला सहा लाखाचा गंडा

एमपीसीन्यूज : केवळ साडे सात हजार रुपयात बत्तीस इंची टीव्ही देण्याचे आमिष दाखवून एका इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकाची तब्बल सहा लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा होलसेल इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्याचा व्यवसाय आहे. 25 जानेवारी रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून एका व्यक्तीचा फोन आला. त्याने उत्तरप्रदेशातील एका टीव्ही कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.

त्याने कंपनीतून 32 इंचाची टीव्ही केवळ साडेसात हजारात देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. विश्वास बसावा यासाठी त्याने फिर्यादीला एक लेटर हेड देखील पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांनी 140 टीव्ही घेण्यासाठी 6 लाख रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यात भरले.

दरम्यान, पैसे भरून अनेक दिवस झाल्यानंतरही टीव्ही मिळाले नाही म्हणून फिर्यादी यांनी आरोपीकडे पैसे परत मागितले. परंतु वारंवार पैसे मागूनही पैसे परत न मिळाल्यामुळे फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.