Pune Crime News : कोंढव्यात महिलेकडून साडेसहा लाखांचा गांजा व चरसचा साठा जप्त 

एमपीसी न्यूज – भाग्योदय नगर, कोंढवा येथून महिलेकडून साडेसहा लाख रुपयांचा गांजा व चरसचा साठा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकने शनिवारी (दि. 27) हि कारवाई केली.
समिना मेहमुद शेख (वय 35, रा. भाग्योदयनगर, ईस्लामिया बेकरी जवळ, कोंढवा खुर्द) असे ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे.

तिच्या राहत्या घरातून 4 लाख 25 हजार 200 रुपये किंमतीचा 21 किलो 260 ग्रॅम गांजा, 2 लाख 27 हजार 668 किंमतीचा 569 ग्रॅम 17 मिली ग्रॅम चरस व पाच हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण 6 लाख 57 हजार 868 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने आपल्या राहत्या घरात गांजा व चरस या अंमली पदार्थांचा विक्रीसाठी साठा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 27) आरोपी महिलेच्या राहत्या घरी छापा तिला ताब्यात घेतले. तसेच अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.