Pune Crime News : भटक्या कुत्र्याच्या अंगावर ट्रक घालून ठार मारले, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पॅन कार्ड क्लब येथील एका बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवर रस्त्यावर झोपलेल्या फिरस्त्या कुत्र्याला ट्रकने धडक देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नीना राय (वय 56) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक (क्रमांक- एमएच.04.ए.क्यू. 1784) याच्यावर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (30 ऑगस्ट) घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने ट्रक भरधाव चालवत बाणेर रस्त्यावर पॅन कार्ड क्लब येथील एका बांधकाम साईटवर झोपलेल्या कुत्र्याला उडवून त्याला ठार मारल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. हा प्रकार घडला त्यानंतर तक्रारदार यांना त्याची माहिती समजली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.