Pune Crime News : दहशत पसरविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध, एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

एमपीसी न्यूज – दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्यावर खून, दंगा, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील सहा वर्षांत त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.

परेश उदय मेहता (वय 22, रा. छाजेड चौक, मंगळवार पेठ, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश मेहता हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर फरासखाना, चतु:श्रुंगी ठाण्यात खून, दंगा, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. अखेर सोमवारी (दि.17) त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित करण्यात आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सक्रिय व दहशत निर्माण करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार मागील आठ महिन्याच्या कालावधीत 21 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.