Pune Crime News : स्मोकिंग करण्यासाठी रूम पार्टनरने जबरदस्ती केल्यामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसीन्यूज : रूम पार्टनरने स्मोकिंग करण्यासाठी तगादा लावल्यामुळे एका 18 वर्षीय तरुणाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगरमधील गुरुदत्त कॉलनीत घडली आहे. तरुणाच्या सुसाईट नोटमुळे संबंधित मित्राला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

सागर अशोक पवार (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय 30) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरने नुकचेत बारावीचे शिक्षण पुर्ण केले होते. तो अनाथ असल्यामुळे आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणानंतर मार्केटिंग क्षेत्रातील एका कंपनीत तो कामाला होता. तीन दिवसांपुर्वी तो कर्वेनगरमधील गुरुदत्त कॉलनीत राहायला आला होता.

त्याच्यासोबत लक्ष्मण रुममेट म्हणून राहात होता. रुममेटबरोबर राहत असताना लक्ष्मणने सागरला सिगारेट ओढण्यासाठी तगादा लावला.

मात्र, त्यास सागरने नकार दिला. त्यामुळे लक्ष्मणने त्याला मारण्याची धमकी दिली. त्याचा ताण आल्यामुळे सागरने गळफास घेउन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापुर्वी सागरने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यानुसार लक्ष्मणने स्मोकिंग करण्यासाठी तगादा लावला होता. जर स्मोकिंग केले नाही, तर मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.