Pune Crime News : पुणे पोलिसांच्या कथित गलथान कारभारामुळे पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळे यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळे यांचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यांच्या पत्नीने पुणे पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत. पोलिसांच्या गलथान कारभारामुळे पतीने स्वतःला जाळून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शामल पिंगळे म्हणाल्या, माझे पती एका कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करतात. दरवर्षी त्यांचे कंत्राट रिन्यू होत असते. परंतु, यावर्षी पोलीस व्हेरिफिकेशन बाकी असल्यामुळे हे कंत्राट आणि होत नव्हते. मागील अनेक दिवसांपासून ते पोलीस व्हेरिफिकेशन मिळवण्यासाठी चकरा मारत होते. परंतु, त्यांना ते वेळेत मिळाले नाही. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात होते. परंतु, त्यांच्यावर मात्र आजवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही. असे असतानाही त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन मिळत होते. त्याला सर्वस्वी पोलिस कारणीभूत आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे पोलीस आयुक्तालयातील गेट क्रमांक तीनवर नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जातो. येथे नोंदणी केली जाते. त्यानंतरच सर्व सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जातो. दरम्यान, बुधवारी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या आयुक्तालयाच्या बाहेर सुरेश पिंगळे यांनी स्वतः अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि पेटवून घेतले. त्यानंतर ते पेटलेले अवस्थेतच आयुक्तालयाच्या गेटमधून आत शिरले. ते पळत गुन्हे शाखेच्या कार्यालयापर्यंत पोहचले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागे धाव घेतली. त्यांना विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. पण, तो मोठ्या प्रमाणात पेटलेले होते. पोलीसांना त्याच्या अंगावर कपडे टाकून त्याला विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या रुग्णवाहिका व्हॅनमधून ससून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत सुरेश हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, आयुक्तालयात पेटून घेतल्याने एकच गोंधळ आणि खळबळ उडाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.