Pune Crime News : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझरीकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरात फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगररचना विभागाचे निलंबित सह संचालक हनुमंत जगन्नाथ नाझरीकर (वय 55 वर्ष, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड पुणे) यांना अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली.

बारामती शहर पोलीस ठाण्यात नाझरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते. नाझरीकर यांच्याविरोधात पुणे शहर पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मागील एक महिन्यांपासून ते पोलिसांना चकवा देत फिरत होते. पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेण्यासाठी मागील एक महिन्यांपासून प्रयत्न करत होते.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील आरोपीचे वास्तव्याची ठिकाणे सीसीटिव्ही फूटेजेस तपासणी करीत असताना, नाझरीकर हा महाबळेश्वर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ठिकाणी नाकींदा महाबळेश्वर परिसरातून त्याला अटक केली आहे. पुढील तपासासाठी त्याला बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.