Pune Crime News : दिवाळीच्या दिवशी मिठाई चोरणारा तडीपार ‘झुरळ्या’ जेरबंद

एमपीसीन्यूज : दिवाळीच्या दिवशी मिठाईचे दुकान फोडून दुकानातील रोख रक्कम, मिठाई आणि ड्रायफ्रूट चोरून नेणाऱ्या ‘झुरळ्या’ला समर्थ पोलिसांनी जेरबंद केले. आकाश उर्फ झुरळया पाटोळे असे त्याचे खरे नाव आहे.

पुण्याचा भवानी पेठेतील मिठाईचे दुकान फोडण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. चोरट्याने दुकानातील रोख 48 हजार रुपये, ड्रायफ्रुट आणि मिठाईचे बॉक्स चोरून नेले होते. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

झुरळ्या हा अट्टल गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा भंग करून तो शहरात आला होता. त्याच्यावर पंधराहून अधिक गुन्हे नोंद आहे.

त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून त्याने शहरात येऊन घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.