Pune Crime News : वानवडीत अल्पवयीन गुन्हेगाराची दहशत, हातात कोयता घेऊन महिलांना धमकावले

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून घरात घुसून एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. इतकेच नाही तर घरातील सामानाची तोडफोड करत इतर घरामध्ये घुसून महिलांना धमकी देत दहशत पसरली.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकडी येथे सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. यातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. याप्रकरणी राजू एकनाथ थोरात (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे घरात असताना, आरोपी त्यांच्या घरात आले. ‘तेरा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडूंगा, मेरे भाई के मर्डर मे उसका भी हाथ है” असे म्हणत हातातील कोयता फिर्यादीच्या डोक्यावर जोरात मारला. परंतु फिर्यादीने तो पडल्यामुळे फ्रिजच्या दरवाजाला लागला. त्यानंतर आरोपीने लोखंडी हत्याराने टीव्ही पाण्याचा माठ घरातील कपाट इत्यादी वस्तू फोडून नुकसान केले.

एकदा तिच्या घराशेजारी राहणाऱ्या काही घरामध्ये घुसून तेथील महिलांना धमकी देऊन शिवीगाळ केली आणि घरातील वस्तूंचे नुकसान करत दहशत पसरली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.