Pune Crime News : खडकी, पुणे परिसरात दहशत पसरविणारा गुन्हेगार स्थानबध्द

एमपीसी न्यूज – खडकी पोलिस ठाण्याच्य हद्दीत तसेच पुणे हद्दीत धारदार शस्त्रात्रांसह आपली आणि आपल्या साथीदारांची दहशत पसरविणार्या सराईत गुन्हेगारास खडकी पोलीसांनी स्थानबध्दतेची शिक्षा केली आहे.

 

देवेंद्र रामलाल बिडलान (वय 24,रा. भाऊ पाटील रोड, कांबळे वस्ती,बोपोडी) असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.देवेंद्र बिडलान याने पुण्याच्या हद्दीत तलवार, कोयता, पालघण, लोखंडी पाईप या शस्त्रात्रांच्या सहाय्याने खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारानिशी दरोडा, दुखापत करणे, दंगा,बेकायदा हत्यार बाळगणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची त्याच्यानावावर नोंद आहे.

 

देवेंद्रच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.तसेच त्याच्यापासून जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल या भितीने नागरिक त्याच्याविरुध्द तक्रार करीत नसत.याबाबत सर्व कागदपत्र तपासल्यावर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्यावर एक वर्षाकरीता नागपूर तुरुंगात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची शिक्षा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.