_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Crime News : ‘त्या’ खुनाला अखेर वाचा फुटली, नशापाणी करण्यास विरोध केल्यानेच केला खून

एमपीसी न्यूज – पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी इस्माईल शेख (वय 65) या ज्येष्ठ व्यक्तीचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. अज्ञात आरोपीने डोक्यात दगड घालून या व्यक्तीचा खून केला होता.

लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान खुनाचा हा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद आजाद सुकसाहब शाह (वय 21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

नशापाणी करण्यासाठी मज्जाव केल्यामुळे झालेल्या भांडणाचा रागात त्याने हा खून केल्याचे कबूल केले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, इस्माईल शेख हे लष्कर परिसरात कचरा गोळा करून आपली उपजीविका भागवत होते. एका झोपडीवजा घरात ते राहत होते. तीन दिवसांपूर्वी रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या राहत्या घरात मृतदेह सापडला होता. गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.

दरम्यान हा खून झाला तेथून जवळच आरोपी हा आपल्या वहिनी आणि भावासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दारू पिला नशा करण्याचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मयत इस्माईल शेख हे त्याला नशा करण्यासाठी विरोध करत होते. तसेच परत गावाकडे उत्तर प्रदेश ला जाण्यासाठी सांगत होते. याच रागातून त्याने इस्माईल शेख हे पाच तारखेला रात्री झोपेत असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.