Pune Crime News : 25 कोटीचा जीएसटी चुकवणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ व्यावसायिकांचा जामीन अर्ज फेटाळला

एमपीसीन्यूज : बोगस फर्म स्थापन करुन 25 कोटी, 56 लाख, 30,554 रुपयांचा जीएसटी चुकवणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ तीन व्यावसायिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. घोरपडे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

कुणाल मोहन दास, अनिल यादव, चिराग बन्सल या तिघांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. जीएसटी खात्यातील इंटिलिजन्स डिपार्टमेंच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कोर्टात हजर केले.

या तिघा आरोपींनी चार बोगस फर्म स्थापन करुन 25 कोटी, 56 लाख, 30,554 रुपयांची जीएसटी खात्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी कोर्टात करण्यात आली होती.

या आरोपीतर्फे जामीन मिळावा म्हणून मिळावा म्हणून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अर्जाला जीएसटीतर्फे विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी विरोध केला.

आरोपींना जामीन मिळाल्यास ते पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. आरोपींनी फक्त कागदोपत्री व्यवहार दाखवून इनपुट टॅक्स क्रेडीटमध्ये 25 कोटी, 56 लाख 30,554 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये आढळले. त्यामुळे कलम 132 नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या नमूद फर्मच्या पत्त्यावर गेले असता त्या फर्म अस्तित्वात नसल्याचे चौकशीत आढळले.

आरोपींनी फर्मच्या नावावर प्रत्यक्ष देवाण – घेवाण न करता खोट्या इनव्हाइसची देवाण – घेवाण करुन इनपूट टॅक्स क्रेडीटचा गैरव्यवहार करण्यात येत होता, असे घाटे यांनी कोर्टात युक्तीवादात सांगितले. कोर्टाने आरोपींचा जामीन फेटाळला.

याप्रकरणाचा तपास उपायुक्त अंकीत कौल यांच्या मार्गदर्शनाखाली जेरी परेरा हे तपास अधिकारी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.