Pune Crime News : मातीचे सोने करण्याच्या आमिषाने सराफाला 50 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शहरातील हडपसर परिसरातील एका सराफासोबत जवळीक वाढवून तिघांनी बंगालमधील मातीचे सोने होते, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 50 लाख रुपयांना फसवणूक केली आहे. ही घटना 2020 ते जानेवारी 2021 कालावधीत घडली.

याप्रकरणी मुकेश चौधरीसह तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल नंदलाल वर्मा (वय 39, रा. माँ इमारत, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसरमध्ये विपूल वर्मा यांचे पवन ज्वेलर्स नावाने दुकान आहे. आरोपी चौधरी हा मूळचा हरियाणा येथील आहे. त्याचा गाई व दुग्ध पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे.अंगठी खरेदीच्या निमित्ताने विपूल आणि मुकेश यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये घरगुती संबंध निर्माण झाले. तिन्ही आरोपींनी विपूल यांच्यासोबत संगनमत केले. त्यासाठी त्यांना पनीर, तांदूळ धान्य देऊन विश्वास संपादन केला. आरोपींनी विपूल यांच्या वडिलांशी जवळीक साधून आमच्याकडे बंगाल येथून आणलेली माती आहे, माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते असे सांगितले.

त्यानंतर तिघांनी हातचलाकीने त्यांनी माती गरम करण्याच्या बहाण्याने सोने काढून दाखवले. त्यानंतर आरोपी मुकेशन विपूलला घरातील लग्न असल्याचे सांगत यांच्याकडून पैशाची मागणी केली. त्याबदल्यात त्याने बंगाल येथून आणलेली 4 किलो माती त्यांना दिली. तिन्ही आरोपींनी माती दिल्यानंतर विपूल यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे 48 तोळे दागिने सोन्याचे आणि 30 लाखाची रोकड घेतली. त्यानंतर काही दिवसांनी विपूल यांनी माती गरम करून सोने करण्याचा प्रयत्न केला असता सोने झालेच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सौरव माने तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.