Pune Crime News : पहिल्या पत्नीची माहिती लपवून केले दुसरे लग्न 

एमपीसीन्यूज  : पहिल्या पत्नी विषयीची माहिती लपवून ठेवून दुसरे लग्न करणाऱ्या एका भामट्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसविंदर सिंह (वय 39) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात एक 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि आरोपीची एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. परंतु आरोपी व्यक्तीचे पहिले लग्न झालेले असतानाही त्याने याची माहिती फिर्यादीला न देता तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर एके ठिकाणी नेऊन  तिच्या सोबत लग्नही केले.

त्यानंतर फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले. दरम्यान, त्याचे  यापूर्वीच लग्न झाले असल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.