Pune Crime News :- बाप रे ! तेरा दिवसाच्या बाळाला आई-वडिलांनीच पुरले

सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार

एमपीसीन्यूज : सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तेरा दिवसाच्या बाळाला आई-वडिलांनी पुरून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या बाबत माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका छोटेखानी जंगलामध्ये तेरा दिवसाच्या बाळाला आई-वडिलांनीच पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सिंहगड महाविद्यालयाच्या होस्टेलजवळ असणाऱ्या या जंगलात धाव घेतली आहे.

हा खड्डा खणण्यासाठी आवश्यक त्या परवानगी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.