Pune Crime News : हातगाड्या सोडविण्यासाठी लाच स्वीकारणा-या दोघांना रंगेहात पकडले

एमपीसीन्यूज : पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर हातगाड्या सोडवण्यास मदत करण्यासाठी लाच स्वीकारताना दोन खासगी व्यक्तींना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

विलास शिवाजी अभंगे आणि ऋतिक वाळके अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पदपथावर लावण्यात आलेल्या हातगाड्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. अशीच कारवाई येरवडा परिसरात केली होती. त्यावेळी विलास आणि ऋतिकने पथारी व्यावसायिकांकडून गाड्या सोडून देण्यासाठी म्हणून चार हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.