Pune Crime News : धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये भर रस्त्यात जुंपली

एमपीसीन्यूज : वडापावची हातगाडी चालवणाऱ्या महिलेच्या पतीचा एका ग्राहक महिलेस धक्का लागला. यामुळे ग्राहक महिलेने तिच्या पतीला हाताने व पर्सच्या सहाय्याने मारहाण केली. यावेळी पतीला पत्नी वाचवण्यास गेलेल्या महिलेला संबंधीत महिलेने बुक्के मारुन व नखांनी डोळ्याखाली ओरबडून जखमी केले.

ही घटना विश्रांतवाडी येथील बुध्दविहारमागे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका 36 वर्षीय महिलेविरुद्द गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी 39 वर्षीय महिला व तिच्या पतीची बुध्दविहारमागे वडापावची गाडी आहे. सायंकाळी पती-पत्नी दोघेही वडापावच्या गाडीवर काम करत होते. यावेळी फिर्यादी महिलेच्या पतीचा तेथे ग्राहक म्हणून आलेल्या महिलेस धक्का लागला. याचा राग येऊन संबंधीत महिलेने फिर्यादीच्या पतीस हाताने व पर्सच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

यावेळी फिर्यादी पतीला वाचवण्यासाठीमध्ये पडल्या. यामुळे संबंधीत महिलेने फिर्यादीला बुक्कया मारल्या तसेच हाताच्या नखाने डोळ्याच्या खाली ओरबडून जखमी केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.