Pune Crime News : भरधाव कंटेनरच्या धडकेत महिला ठार

एमपीसीन्यूज : भरधाव कंटेनरने रस्ता क्रॉस करणाऱ्या महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुणे -सातारा बायपास रस्त्यावर रविवारी हा अपघात घडला.

कविता रेऊजी फडतरे (वय 38, रा. वारजे माळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कंटेनरचालक प्रसार झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कविता या पुणे सातारा रस्त्यावरील हॉटेल मराठेशाई समोरील रस्ता ओलांडत होत्या. यावेळी पुण्यावरून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनर जागेवर सोडून पळ काढला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.