Pune Crime News : तक्रार मागे न घेणाऱ्या तरुणाला चाकूने भोसकले

एमपीसीन्यूज ; पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुजरवाडी येथे हा प्रकार घडला.

आकाश राजू पाटणकर (वय 23), असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी फिर्याद दिली असून विशाल उर्फ मोन्या फाटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आकाश पाटणकर हा दुचाकीवरुन जात असताना आरोपीने त्याला अडवले आणि ‘तुला लई माज आला का’,असे म्हणत त्याच्या छातीत चाकू खुपसला. या घटनेत आकाश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार आहे. 2017 मध्ये त्याने आकाश पाटणकरला मारहाण केली होती. त्यावेळी आकाशने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तो सातत्याने आकाशवर दबाव टाकत होता.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III