Pune Crime News : ओंकारेश्वर घाटावरील तांबा पितळेचे 40 तांबे, 40 ताम्हणसह दशक्रिया विधीच्या साहित्याची चोरी

एमपीसी न्यूज – पुण्यातील ओमकारेश्वर घाटावर दशक्रिया आणि अन्य विधीसाठी नागरिक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या एका हॉलमध्ये दशक्रिया विधी साठी लागणारे साहित्य एकत्र करून ठेवले जाते. परंतु हे सर्व साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय. अज्ञात चोरट्यांनी ओंकारेश्वर घाटावर असणाऱ्या कोलचेस्टर उचकटून चांदी तांबे व पितळेची 40 तांबे, 40 ताम्हण, पळी भांड्याची सेट, पराती, पातेले आणि आणखी बरेच साहित्य चोरून नेले.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दशक्रिया विधी आणि इतर विधी साठी याठिकाणी नागरिकांना आता हे साहित्य काढले जाते. त्यानंतर पुन्हा हे साहित्य हॉलमध्ये बंद करून ठेवले जाते. परंतु या ठिकाणी आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारे चोरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी हॉलचे पत्रे उचकटून भांडी पळवून नेली होती. आता मात्र चोरट्यांनी शटर उचकटून एच भांडी चोरली आहेत.

दरम्यान या ठिकाणी वारंवार होणारे चोरीचे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.