Pune Crime News : पेस्ट कंट्रोल केल्याने घराबाहेर गेलेल्या व्यवसायिकाच्या घरी 21 लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – घरात पेस्ट कंट्रोल केल्यामुळे एक दिवस दुसरीकडे राहण्यास गेलेल्या व्यवसायिकाच्या घरातून चोरट्यांनी 21 लाख 16 हजार रुपयांचे हिरे-सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी शंतनू गणेशराव ढाेले-पाटील (वय-39) यांनी काेराेगाव पार्क पाेलीस ठाण्यात तक्रार दिली असून पाेलीस आराेपींचा शाेध घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शंतनू ढाेले-पाटील हे ढाेले पाटील रस्त्यावर सिंधुदत्त चेंबर मध्ये राहत असून सात डिसेंबर राेजी त्यांनी घरात पेस्ट कंट्राेल केले हाेते. त्यामुळे घर बंद ठेवण्याच्या उद्देशाने ते तळेगाव येथील फार्म हाऊसवर कुटुंबासमवेत राहाण्यासाठी गेले हाेते. यादरम्यान, अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. बेडरुम मधील कपाटातील साेन्याचे दागिने, डायमंड हार, पेंडल, दाेन लाख रुपये राेख रक्कम घेऊन चाेरटे पसार झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शंतनु ढाेले पाटील घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरातील लाेखंडी तिजाेरीतील दागिने, राेख रक्कम चाेरीस गेल्याचे दिसून आले.

याबाबत त्यांनी पाेलिसांकडे तक्रार केल्यानंतर, काेरेगावपार्क पाेलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जागेचा पंचनामा करत, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चाेरट्यांचा शाेध सुरु केला आहे. पाेलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके याबाबत पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.