Pune Crime News : नांदेडहून पुण्यात येत वाहन चोरी करणारे चोरटे जेरबंद, 23 दुचाकी जप्त

एमपीसीन्यूज : दुचाकी चोरण्यासाठी नांदेड होऊन पुण्यात येत शहराच्या विविध भागातून दुचाकी चालणाऱ्या तीन चोरट्यांना अटक करुन आणि दोन अल्पवयीन चोरट्यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 23 दुचाकी जप्त केल्या आहेत. याची किंमत साडेसात लाख रुपये इतकी आहे.

गौस मीरासाहेब शेख (वय 19, रा. नांदेड), रशिद मेहबूब शेख (वय 20) व शाहरुख पाशामिया शेख (वय 21) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

शहरात वाहन चोऱ्या आणि घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप तरी या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, वानवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी कर्मचारी सुदर्शन बोरावके आणि शिरीष गोसावी यांनाबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही तरुण पुण्यात येऊन दुचाकी चोरतात वाट्या दुचाकी इतर जिल्ह्यात विकतात. या माहितीची खात्रीपूर्वक तपासणी केली. त्यानंतर या तरुणाचा शोध सुरू केला.

यावेळी तिघेही नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाराली गावचे असल्याचे समजले. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या एका टीमने बाराली गावात जाऊन या तिघांना पकडले. तर त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार देखील ताब्यात घेतले आहेत.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. तसेच या दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणी नेहून विक्री केल्या असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून 9 लाख 69 हजार रुपयांच्या 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.