Pune Crime News : स्कॉर्पिओतून आलेल्या चोरट्यांनी म्हशीची चार वासरे पळवली

एमपीसी न्यूज –  पुण्याच्या विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही चोरट्यांनी नुकतीच जन्मलेली म्हशीची चार वासरे चोरून नेल्याची घटना घडली.

विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयूर बिडकर यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात फिर्यादी यांचा म्हशीचा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यात म्हशींसोबतच कोंबड्या, गाई देखील आहेत. त्यांच्या याच गोठ्यातील चार म्हशींनी काही दिवसांपूर्वीच वासरांना जन्म दिला होता.

अज्ञात चोरटे रात्रीच्या वेळी या वासरांना स्कॉर्पिओ गाडीतून घेऊन पसार झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता स्कॉर्पिओ सापडली. पण, ती चोरीची असल्याचे दिसून आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.