Pune Crime News : मोबाईल टॉवरवरील बेस बँड चोरणारे चोरटे गजाआड, 61 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन चोरट्यांना जेरबंद केले. हे चोरटे मोबाईल टॉवरवरील 3 जी आणि 4 जी नेटवर्क कव्हरवेज करणारे बेस बँडची चोरी करून ते भंगारमध्ये विकत असत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकीसह 61 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुफरान लतीब राज उर्फ बाबा (वय 40) आणि महेश हनुमंत परीट अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्याची नावे आहेत. हे दोघेही सराईत चोरटे असून त्यांनी पुणे शहर पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केलेले अकरा पुणे उघडकीस आलेले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कॅनॉल जवळ मोबाईल टावरवरील स्पेअर पार्टची चोरी करणारे चोरटे थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी मोबाईल टॉवरवरील 4 जी नेटवर्क मोबाईल टॉवरवरील 4 जी नेटवर्क कव्हरेज करणारे बेस बँड चोरून भंगारमध्ये विकल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी भंगार विक्रेता समीरउल्ला अजीमउल्ला शहा याला अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल टॉवरवरील 6 बेस बँड, 11 रुस कार्ड आणि दोन टीआरएक्स असा 60 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1