Pune Crime News : तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

एमपीसी न्यूज – तडीपारी आदेशाचा भंग करून पुणे शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या मध्ये मायलेकाचा समावेश आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा रमेश हातांगळे (वय 35, रा. चंदननगर) व प्रशांत रमेश हातांगळे (वय 19) अशी माय लेकाची तर दिनेश चंद्रशेखर नायडू (वय 34) नावेत आहेत. येथील सीमा आणि प्रशांत हे मायलेक आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख फेब्रुवारी महिन्यात या दोन्ही आरोपींना पिंपरी चिचवड व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तरीही हे आरोपी चंदननगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

शहरातून तडीपार केल्यानंतर हे आरोपी परत शहरात येऊन गुन्हे करत आहेत. त्यामुळे तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.