Pune Crime News : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी तिघे अटकेत

एमपीसी न्यूज – धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तीघांना अटक केली आहे. यामध्ये पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे.

याप्रकरणी लेखा परिक्षक विलास काटकर यांनी लेखा परिक्षण केले असता 47 कोटी 9 लाख 81 हजारांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. सहकारनगर पोलीस ठाण्यात 2020 मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संस्थेचे संचालक व पदाधिकाऱ्यांनी परस्पर रकमा काढून घेतल्याचे म्हटले आहे.

पतसंस्थेचे व्यवस्थापक काशिनाथ केरबा बनसोडे(रा.आंबेगाव पठार), रोखपाल गौतम नाना जोगदंड(रा.आंबेगाव पठार) व क्‍लार्क कम अकाऊटंट शंकर सटवा जोगदंड(रा.धनकवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

आदर्श नागरी पतसंस्थेच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आजवर 161 गुंतवणूकदारांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानूसार 6 कोटी 78 लाख 52 हजारांची फसवणूक झाली आहे. या पतसंस्थेत 26 डिसेंबर 1991 ते 20 जानेवारी 2018 दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखा परिक्षणात निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.