Pune Crime News: युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरणातील आणखी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभागप्रमुख दीपक मारटकर खून प्रकरणी काल (शनिवारी) आणखी तीनजणांना अटक करण्यात आली आहे.  बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने राजकीय वैमनस्यातून कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. 

पोलीसांनी याप्रकरणी यापूर्वी अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर महंकाळे (वय 19) या तिघांना अटक केली होती. तर शनिवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.

अश्विनी कांबळे आणि दीपक मारटकर यांच्यात राजकीय वैमनस्य होते. त्यामुळे या हत्या प्रकरणात या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कारण आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणांमध्ये दीपक मारटकर त्यांच्या हालचाली स्थानिक व्यक्ती आरोपींना देत असल्याची माहिती पुढे आली आहे.

खून झाला त्या दिवशी दीपक मारटकर हे घराबाहेर बसण्याची माहिती ही त्यानेच इतर आरोपींना दिली होती. आणि त्यानंतर आरोपींनी घटनास्थळी येऊन मारटकर यांचा खून केला.

दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर आले आणि एका मित्रासोबत बसले होते.

यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने सपासप 48 वार केले. जखमी अवस्थेत दीपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.