Pune Crime News : खासगी पार्टीत तिघे जण मैत्रिणीसमोर नग्न होऊन नाचले, एकाला अटक

एमपीसी न्यूज – वाढदिवसाला कपडे काढून नग्नावस्थेत नाच करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साळुंके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

राज उर्फ कैलास महेश गणात्रा (वय 47) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार अमोल कंडई व सिद्धार्थ शेट्टी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

तिन्हीही आरोपी फिर्यादी महिलेच्या ओळखीचे आहेत. 25 ऑक्टोबरला राजचा वाढदिवस असल्याने महिला त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज उर्फ कैलाश, अमोल, आणि सिद्धार्थ यांनी गाण्याच्या तालावर नाच सुरु केला. त्यानंतर प्रत्येक जण अंगावरील सर्व कपडे काढून महिलेसमारे नग्नावस्थेत नाचू लागले. त्यानंतर त्यांच्या अंगाला हात लावून अश्लिल वर्तन केले.

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. घटनेचा धक्का बसल्याने महिला तब्बल महिनाभर आजारी असल्यामुळे त्यांनी उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.