Pune Crime News : संदीप मोहोळ खून प्रकरणातील तिघांना जन्मठेप

एमपीसी न्यूज – पौड रस्त्यावर 2006 मध्ये कुख्यात गुंड संदिप मोहोळ याचा निर्घृण खून झाला होता. या खून प्रकरणी न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पुराव्याअभावी 10 आरोपींची निर्दोष सुटका केली. मोक्का कोर्ट न्यायाधीश शिरीसकर यांनी निकाल दिला आहे.

सचिन पोटे, जमीर शेख व संतोष लांडे अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तिघांची नावे आहेत. तर संजय कानगुडे, समीर उर्फ सम्या शेख, गणेश मारणे, सचिन मारणे, राहुल तारू, अनिल खिलारे, विजय कानगुडे, शरद विटकर, निलेश माझीरे, राहील शेख अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी मोक्का, आर्म ऍक्ट, खून यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, टोळीयुद्धातून 4 ऑक्टोबर 2006 रोजी रस्त्यावर संदीप मोहोळ याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गणेश मारणे याच्यासह एकूण 18 जणांवर गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर पोलिसांनी 18 आरोपींना अटकही केली होत. पोलिसांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तेव्हा पासून हा खटला पुण्यातील कोर्टात सुरू होता.

मागील महिन्यात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद पार पडला होता. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. दरम्यान आज सकाळच्या सुमारास न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला असून या प्रकरणातील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वला पवार यांनी काम पाहिले, तर आरोपींच्या बाजूने ऍड. सुधीर शहा, ऍड संदीप पासबोला, धैर्यशील पाटील, ऍड, सुरेशचंद्र भोसले, ऍड, जितेंद्र सावंत, ऍड. राहुल भरेकर यांनी या खटल्यात काम पाहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.