Pune Crime News : काळूबाई मंदिरातून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस

एमपीसी न्यूज-अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे (Pune Crime News) वसाहतीतील एका मंदिरातून चोरट्यांनी अडीच लाखांचे सोन्याचे दागिने तसेच गल्ल्यातील 25 हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत राजेश गद्रे (वय 43, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे आई-वडील अरण्येश्वर भागातील अण्णाभाऊ साठे वसाहतीत राहायला आहेत.

Alandi News : आळंदीमध्ये होळी उत्साहात साजरी

 

वसाहतीत गद्रे यांच्या घरात श्री काळूबाई देवीचे मंदिर आहे. चोरट्यांनी घराचे कुलुप उचकटून आत प्रवेश केला. देवीचे अडीच लाख रुपयांचे दागिने आणि 25 हजारांची रोकड चोरट्यांनी (Pune Crime News) लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.