Pune Crime News : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने आरटीआय कार्यकर्त्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल कांबळे व जहीर मेमन अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर रामचंद्र अल्हाट (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुधीर आल्हाट हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. आरोपी राहुल कांबळे व जहिर मेमन हे दोघे सुधीर आल्हाट यांनी कोठे आरटीआय टाकला आहे याबाबत माहिती घेत. तीच माहिती ते दोघे घेत. त्यानंतर त्या माहितीवर ब्लॅकमेल करत. तर अतिवरिष्ट अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. दरम्यान त्यांनी सुधीर आल्हाट यांना 2 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. त्या दोघांनी त्यांच्याकडून ऑनलाइन 25 हजार तीन वेळा असे 75 हजार रुपये बँक खात्यावर घेतले.

त्यानंतर शुक्रवारी जंगली महाराज रस्त्यावर एक हॉटेलात भेटण्यास बोलावले व उर्वरित सव्वा लाख रुपयांची खंडणी मागणी केली. त्यानुसार दोघे आल्यानंतर आज सुधीर आल्हाट व खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा व त्यांच्या पथकाने सापळा रचून साखर संकुलसमोर या दोघांना पैसे देताना रंगेहात पकडले. या सर्व प्रकाराचे लाईव्ह मोबाईलमध्ये कैद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.