Pune Crime News : सराईत गुन्हेगाराचा खून करून पसार झालेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार जगदीश पारदे याचा खून करून कोथरूड परिसरातील डुक्कर खिंड येथे त्याचा मृतदेह फेकून देणाऱ्या या दोघांना अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहे. तेजस दत्तात्र्य भालेराव (वय-21,रा.मुळशी,पुणे) व महेश मलिक अहिवळे ((23,रा.किरकटवाडी,नांदेड,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.

काेथरुड परिसरातील डुक्कर खिंड येथे 20 जानेवारी राेजी अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. कपाळावर, ताेंडावर, हणुवटीचे खाली धारदार शसस्त्राने खाेलवर गंभीर दुखापत करुन त्यास जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने फेकून दिलेला मृतदेह वारजे पाेलीसांना मिळून आली हाेती. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना फुरसुंगी कात्रज बायपास रस्त्यावर या गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचेविराेधात यापूर्वी एमपीडीएनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.