Pune Crime News : उत्तर प्रदेशातून पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, 4 किलो 257 ग्रॅम गांजा जप्त

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशमधील चित्रकुट येथून पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. कृषी विद्यापीठ चौक, शिवाजीनगर येथून बुधवारी (दि.09) ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4 किलो 257 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.  

ब्रजेंद्रकुमार राजेंद्रकुमार त्रिपाठी (वय 29) आणि शिवकुमार लवलेश त्रिपाठी (वय 19) (दोघेही रा. चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक यांना कृषी विद्यापीठ चौक, शिवाजीनगर येथे दोन इसम गांजा घेऊन थांबल्याची गुप्त माहिती मिळाली.

या पथकांनी संयुक्तपणे याठिकाणी कारवाई करत दोघांना ताब्यात घेत, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.