Pune Crime News : न्यायालय परिसरात तरुणाची सोनसाखळी हिसकावली

एमपीसीन्यूज : न्यायालय आवारात दुचाकी पार्क करून करुन थांबलेल्या तरूणाची 24 हजारांची सोन्याची चेन हिसकाविणा-या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केले. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.

सनी छगन ससाणे (वय 20) आणि अनिल मच्छिंद्र सावंत (वय 30,रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवेक नगरे (वय 20 ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेआठच्या सुमारास विवेक न्यायालय परिसरात दुचाकी पार्क करून थांबले होते.

त्यावेळी तेथे आलेल्या सनी आणि अनिलने विवेकला धक्काबुक्की करून गळ्यातील 24 हजारांची सोन्याची चेन हिसकावून नेली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केले.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. मुंढे तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.