Pune Crime News: सुरक्षारक्षकाचा ड्रेस घालून एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  सुरक्षारक्षकाचा ड्रेस घालून एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जगदीश जगदेव हिवराळे (वय 30) आणि भगवान विश्वनाथ सदार (वय 38) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी रस्त्यावरील एका एटीएम केंद्रातील एक्साइड कंपनीच्या आठ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला होता. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सुरक्षारक्षकाच्या ड्रेसमध्ये आलेल्या दोघांनी या बॅटऱ्या सोडून गेल्याचे उघडकीस आले होते. आणि हे दोघे चोरटे घोरपडी पेठेतील त्रिकोणी गार्डन येथे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी व इतर साहित्य असे एकूण दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील आरोपी विश्वनाथ सदार हा पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. त्याला एटीएम सेंटरमध्ये बॅटरी कुठे ठेवतात व त्या कशा काढायच्या त्याची पूर्ण माहिती होती. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही सोळा गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.