Pune Crime News : सॉफ्टवेअर कंपनीतील 70 लाखांचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक; येरवडा पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – कल्याणीनगर सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाख रूपयांचे नेटवर्किंग साहित्य चोरणाऱ्यासह दोघांना येरवडा पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये अटक केली. त्यांच्याकडून 52 लाख 50 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गणेश धोंडिराम डोलारे (वय ३१, रा. न-हे ) आणि कुलदीप रामकरण चौहान (वय ३३, रा. बांद्रा इस्ट, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मकरंद बेलुलकर रा. आंबेगाव बुद्रूक यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीतील नेटवर्किंगचे 70 लाखांचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करीत असताना, त्यांनी संशयित गणेश डोलारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कंपनीतील वायफाय अ‍ॅक्सेस पॉइंट चोरल्याची कबुली दिली. चोरलेले साहित्य त्याने मुंबईतील कुलदीपला विकल्याचे सांगितले.

त्यानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, किरण घुटे, अमजद शेख, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे यांच्या पथकाने कुलदीपला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.