-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : गरीब व गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – विमाननगर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

महिला एजंट रूपाली उर्फ सरोजा विष्णू बक्षी (वय 44, नाना पेठ, पुणे) आणि संजय विठ्ठलराव भोईटे (वय 59) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विमानतळ परिसरात पुणे महानगरपालिकेचे आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राउंड आहे. अनेक किशोरवयीन मुले या ठिकाणी स्केटिंग प्रशिक्षणासाठी येत असतात. या ठिकाणापासून काही अंतरावर असणाऱ्या एका उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हॅम्लेट सोसायटीतील A/4 या बिल्डिंगमध्ये छापा मारून दोन महिलांची सुटका केली. तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या वरील दोन आरोपींना अटक केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.